मलेरिया लस ● काय आहे मलेरिया? मलेरिया हा डासांच्या चावण्यामुळे होणारा रोग आहे. प्लाझमोडियम वायवॅक्स यामुळे होतो व ॲनाफिलीस डासांद्वारे तो पसरतो. याचा प्रादुर्भाव विषुववृत्तीय भागांत जास्त आहे. मलेरिया चे गांभीर्य लक्षात घेता २५ एप्रिल हा जागतिक मलेरिया दिन म्हणून ओळखला जातो. ● किती घातक आहे मलेरिया? जगभरात मलेरियामुळे एका वर्षात सरासरी चार लाख नागरिकांचा मृत्यू होतो. यामध्ये आफ्रिका खंडातील बालकांची संख्या लक्षणीय आहे.तसेच भारतातील हे प्रमाण ७७०० आहे. ● मलेरिया लसी साठी पूर्वी केलेले प्रयत्न? डासांच्या शरीरात निर्माण झालेले प्लाझमोडियमचे बिजाणूज हे त्यांच्या लाळेद्वारे माणसाच्या शरीरात टोचले जाऊन माणसाला मलेरियाची लागण होते. बिजाणूजपासून लस तयार करण्याची कल्पना १९६७ साली ऑस्ट्रियन-ब्राझिलियन संशोधिका रूथ नुझेनझ्वाइग या संशोधिकेने उचलून धरली होती. इ.स. २००२ साली अमेरिकन संशोधक स्टीफन हॉफमन याने गामा किरणांचा वापर करून अॅनोफेलिस डासाच्या मादीच्या शरीरातील बिजाणूजची रोगकारकशक्ती क्षीण करून त्यापासून लस तयार केली. ही...
Wofpain Shares authentic information about every health related stuff. Idea behind Wofpain is to make you understand about health in comprehensive manner. Wofpain Team consists of Medical Professionals. Each article is written by the team of expert Doctors after gaining knowledge and experience in the field of Medicine and Surgery.