मलेरिया लस |
●काय आहे मलेरिया?
मलेरिया हा डासांच्या चावण्यामुळे होणारा रोग आहे. प्लाझमोडियम वायवॅक्स यामुळे होतो व ॲनाफिलीस डासांद्वारे तो पसरतो.
याचा प्रादुर्भाव विषुववृत्तीय भागांत जास्त आहे. मलेरिया चे गांभीर्य लक्षात घेता २५ एप्रिल हा जागतिक मलेरिया दिन म्हणून ओळखला जातो.
●किती घातक आहे मलेरिया?
जगभरात मलेरियामुळे एका वर्षात सरासरी चार लाख नागरिकांचा मृत्यू होतो. यामध्ये आफ्रिका खंडातील बालकांची संख्या लक्षणीय आहे.तसेच भारतातील हे प्रमाण ७७०० आहे.
●मलेरिया लसी साठी पूर्वी केलेले प्रयत्न?
डासांच्या शरीरात निर्माण झालेले प्लाझमोडियमचे बिजाणूज हे त्यांच्या लाळेद्वारे माणसाच्या शरीरात टोचले जाऊन माणसाला मलेरियाची लागण होते. बिजाणूजपासून लस तयार करण्याची कल्पना १९६७ साली ऑस्ट्रियन-ब्राझिलियन संशोधिका रूथ नुझेनझ्वाइग या संशोधिकेने उचलून धरली होती. इ.स. २००२ साली अमेरिकन संशोधक स्टीफन हॉफमन याने गामा किरणांचा वापर करून अॅनोफेलिस डासाच्या मादीच्या शरीरातील बिजाणूजची रोगकारकशक्ती क्षीण करून त्यापासून लस तयार केली. ही लस टोचलेले उंदीर रोगप्रतिकारक्षम असल्याचे निदर्शनात आले; परंतु ही पद्धत प्रत्यक्ष वापराच्या वेळी अयशस्वी ठरली.
●मलेरियाची लक्षणे?
गुंतागुंत नसल्यास मलेरिआमध्ये असलेली लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत: कपकपीसह थंडी वाजणें. अतीप्रमाणात ताप, डोकेदुखी , आणि उलटी होणे . कधीकधी तरुण रुग्णांना आकड्या येऊ शकतात .
●मलेरिया वरील उपचार
ॲटीमलेरियल औषधे.
●मलेरिया वैक्सीन(लस)? नाव?
(१)जगातील पहिल्या मलेरियाविरोधी लशीला जागतिक आरोग्य संघटनेने मंजुरी दिली आहे.
(२) RTS, S/AS01 असं या मलेरिया लसीचं वैज्ञानिक नाव आहे.
(३) mosquisix हे ट्रेड नाव आहे.
(४) Glaxosmithkline (GSK) या कंपनीने ही लस तयार केली आहे
●मलेरिया वैक्सीन(लस)? खरोखर गरजेची आहे का?
दरवर्षी जगभरातल्या चार लाख लोकांचा मलेरियामुळे मृत्यू होतो तर भारतातील संख्या ऐंशी हजार आहे आफ्रिकेत याचे प्रमाण खूप आहे त्यामुळे मलेरिया ची लस आवश्यक आहे.
●कोण घेऊ शकतं मलेरिया ची वैक्सीन(लस)?
सध्या मलेरिया ची लस ही लहान मुलांसाठी तयार केले आहे पण भविष्यात इतर लोकांसाठी सुद्धा लस निर्मिती करण्याचे प्रयत्न चालू आहेत.
●कशी घेता येईल महेराची वैक्सीन(लस)?
अंतस्नायु( intramuscular)
●लसी मधील घटक?
लसीमध्ये स्किझोंट निर्यात प्रथिने ( protein )(5.1) आणि स्पोरोझोइट पृष्ठभागावरील प्रथिने( proteinl [NANP] च्या 19 पुनरावृत्ती असतात. तंत्रज्ञानाच्या मर्यादा अस्तित्वात आहेत कारण त्यात केवळ 20% पेप्टाइड आहे आणि त्यात इम्युनोजेनेसिटीची पातळी कमी आहे. यात कोणतेही इम्युनोडोमिनेंट टी-सेल एपिटोप्स देखील नसतात.
●वैक्सीन(लस) चे साईड इफेक्ट?
इंजेक्शन दिलेल्या जागी सुज व वेदना.
By-
Dr. Karan Yamgekar
Comments
Post a Comment